Home Created by potrace 1.16, written by Peter Selinger 2001-2019Campaigns Created by potrace 1.16, written by Peter Selinger 2001-2019Bol Created by potrace 1.16, written by Peter Selinger 2001-2019म्हणुन धर्म त्याने बदलून पाहिले - किरण चंद्रकांत चे ‘बोल’

म्हणुन धर्म त्याने बदलून पाहिले - किरण चंद्रकांत चे ‘बोल’

‘धर्म सारे त्याने बदलुन पाहिले’
The Quint
BOL
Published:
धर्म त्याने सारे बदलून पाहिले,रस्ते फक्त बदलले तरी काटे मात्र तेच राहिले
|
(Photo: Erum Gour/The Quint)
धर्म त्याने सारे बदलून पाहिले,रस्ते फक्त बदलले तरी काटे मात्र तेच राहिले
ADVERTISEMENT

'धर्म सारे त्याने बदलुन पाहिले'

धर्म त्याने सारे बदलून पाहिले,
रस्ते फक्त बदलले तरी काटे मात्र तेच राहिले

तिच कट्टरता तिच दांभिकता,
तेच खेळ सारे खेळत राहिले,
तो शोधत होता मानवता,
अन त्याला सारे पशुच गावले,
म्ह्णून धर्म त्याने बदलून पाहिले,

शांतिचे धर्म सारे संदेश देता,
आडवे झेंडे उभे झेंडे फडकत राहिले,
ग्रंथ पवित्र सत्यच होता पण वाचणारा खोटा,
तेच धर्माचे रक्षक आता भक्षक जाहले,
म्हणुन धर्म त्याने बदलून पाहिले

एक चिन्ह एक ग्रंथ अनेक चमत्कारिक गाथा,
वर वर त्याला सारे सुंदर शांत दिसले,
श्लोक अन टोप्या बदलल्या तरी अशांतच त्याचा माथा,
ठेकेदारे बोले तैसे धर्माचे अर्थ लावले,
म्हणुन धर्म त्याने बदलून पाहिले

सर्वांचेच आपले संघ अन संघटना,
प्रत्येकाचेच आपले गुंड अन डोमकावळे,
तो शोधत होता आदर सद्भावना,
मात्र इथलेहि प्रमुख द्वेषात बावळे,
म्हणुन धर्म त्याने बदलून पाहिले

ते म्हणतात सारे काहि तोच करता करविता,
स्वतःचे डोके का चालवावे,
तो प्रश्न विचारत मानवतेचा होता,
अन अमानुष पणे त्यालाच बडवले,
म्हणुन धर्म त्याने बदलून पाहिले

म्हणे आहे शांतीसाठि धर्मसत्ता,
किती धर्मांधळे झुंड जाहले,
धर्म बोलती करुणा तरि चालती घृणा,
आपले जास्त का त्यांचे जास्त एवढेच हिशोब राहिले,
म्हणुन धर्म त्याने बदलून पाहिले

ADVERTISEMENT
ADVERTISEMENT

हे करा ते करु नका इथे जा तिथे जाऊ नका,
स्वातंत्र्याचे धर्म आता पिंजरे झाले,
धर्म त्यास कळतो जो घोकतो श्लोक अन गाथा,
सारे मुके अनुयायी हवे नाहितर यांचे धर्म बुडाले
धर्मसत्तेला टेकु म्हणुन राजसत्ता,
दैवाचे अवतार राजा धर्माने सांगितले,
राजसत्त्ता गेली तरि हुकुमशाहीची सत्ता,
विकास विकास म्हणुन नरडिचे घोट पिले,
म्हणुन धर्म सारे त्याने बदलुन पाहिले
आल्या पिढ्या गेल्या पिढ्या तिच ती हतबलता,
अजुन नाहि शांती म्हणुन पंथ हजारो जन्मले,
देव बदलत राहतील पन मनात तीच अशांतता,
खरा तो माणुसच होता पण काळाने ते देव झाले,
म्हणुन धर्म सारे त्याने बदलुन पाहिले
कशी उगवेल मानवता धर्मांची शेती करता,
माणुसच होते ते मानवतेसाठि होते बनवले,
धर्म बदलले तरी प्रसारक मात्र माणुसच होता,
सत्तेत नेहमी मानव होता अन आपण त्यास देव समजले,
त्याच पाहुन दगडि देवानेहि आता धर्म बदलुन पाहिले....

-किरण चंद्रकांत पाटिल,

नाशिक,महाराष्ट्र.

(At The Quint, we are answerable only to our audience. Play an active role in shaping our journalism by becoming a member. Because the truth is worth it.)

Published: undefined

ADVERTISEMENT
SCROLL FOR NEXT